मोची मादिगा मादगी मादरू महासंघाच्या M4 विदर्भ युवा अध्यक्षपदी निलेश परगंटीवार यांची वरणी....
वणी :-
वणी तालुक्यात मोची मादगी मादरू मादीगा महासंघाद्वारे विविध सामाजिक उपक्रम घेतले जाते. यात तालुका संघटन यांची मौलिक भूमिका असुन वरिष्ठांचा देखिल यात मौलिक वाटा असतो. दिनांक 03 सप्टेंबर 2023 रोजी नागपुर येथील रवी भवन येथे पार पडलेल्या मोची मादिगा मादगी मादरू M4 महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निलेश परगंटीवार यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
मोची मादिगा मादगी मादरू महासंघाची दिनांक 3 ला रवी भवन येथे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मोची मादिगा मादगी मादरू समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक व वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. आर्थिक बजेट मंडण्यात आले दरम्यान युवा विदर्भ प्रमुख ही जबाबदारी देण्याकरिता सभेत अत्यंत लोकशाही पद्धतीने निवड करीत अध्यक्ष मारोती अण्णा पंद्री व महासचिव प्रा सुनील मिद्दे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक घेण्यात आली त्याकरिता निलेश परगंटीवार हे या पदासाठी रिंगणात असताना त्यांच्या विरोधात कुणीही उभे न राहता त्यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली त्यांना नियुक्ती पत्र व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कवी नत्थुजी नगराळे यांच्या दिंडोरी या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले.
नेहमीच मोची मादिगा मादगी मादरू समाजाच्या समस्या शासन दरबारी मांडण्याकरिता महासंघ तत्पर असुन यामुळे युवा अध्यक्षांच्या स्वरूपात संघटन मजबूत होण्यास आणखी बळ मिळणार असल्याचे सुनिल मिद्दे सर यांनी बोलुन दाखविले. यावेळी निलेश परगंटीवार यांनी आपले विचार मांडीत सांगितले की समाज कोणत्याही प्रकारे पिछाडता कामी नये जोमाने कामी लागा आपण एकजूट होऊन पूर्ण पणे समाज घडविण्याकरिता प्रयत्न करू असे यावेळी उपस्थितांनी बोलून दाखविले.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष मारुती अण्णा पंद्री(पुणे), महासंघाचे महासचिव सुनिल मिद्दे सर (नागपुर), महाकोषाध्यक्ष लक्ष्मण अण्णा घाणेलू (मुंबई), कार्याध्यक्ष हरिश्चंद्र नक्कलवार, ऍड रमेश मोरे, राज्य उपाध्यक्ष प्रदीप आधारे, उपाध्यक्ष समय्या पसुला (गडचिरोली) तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले समाजबांधव उपस्थित होते.
0 Comments