ADvt

लाठी येथील इसमाचा शेततळ्यात आढळला मृतदेह


मृतक शंकर जनार्धन खारकर, भावपूर्ण श्रद्धांजली

वणी :- सुरज चाटे

     तालुक्यातील लाठी येथील रहिवासी असलेल्या एका 44 वर्षीय इसमाचा उकणी शिवारातील शेत तळ्यात मृतदेह आढळला असुन त्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 29 शुक्रवारी पहाटे 8.25 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.  
      लाठी येथील वास्तव्यास असलेले मृतक शंकर जनार्धन खारकर, वय 44 वर्ष हे या गावातील निवासी आहेत. शंकर हे ईगल ओबी कंपनी मध्ये कामावर होते. उकणी शिवारात अजय बलकी यांचे शेत आहे. त्याच शेतात शेततळे आहे. शुक्रवारी पहाटे 4 वाजताच्या दरम्यान शंकर हे घरून निघाले होते. शेततळ्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला अशा घटनेची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतक व्यक्ती लाठी येथील शंकर असल्याचे निष्पन्न झाले 
     मृतक शंकर हा नेमका त्या शेत शिवारात कोणत्या कामानिमित्त गेला होता? ही आत्महत्या की घातपात?.... असे विविध प्रश्न उपस्थित होत असुन हे सर्व पोलीस तपासातून निष्पन्न होणार आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पुढील तपास पोलीस करीत आहे. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई वडील, लहान भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. शंकरच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 
     

Post a Comment

0 Comments