ADvt

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभंग-अखंड साहित्य पुरस्कार प्रदान




वणी :- सुरज चाटे
     मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद वणीद्वारा आयोजित अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त (1ऑगस्ट)मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत "मराठी साहित्याचा मानबिंदू - अण्णाभाऊ साठे" या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.दोन गटात घेतलेल्या या निबंध स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला.
     यात खुल्या गटातून वसुधा ढाकणे, दत्तात्रय पुलेनवार, मनोज धांडे,राणी लखमापुरे, सुवर्णा वाढई तर विद्यार्थी गटात वैष्णवी रक्ताटे मंजुषा देवसरकर,श्रेयस कुर्ले,धनश्री पाऊणकर,दृष्टी राणे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर बक्षीस स्वरूपात अण्णाभाऊंचे साहित्य आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.दरम्यान,  साहित्य परिषदे मार्फत प्रथमच देण्यात येणाऱ्या "अभंग-अखंड साहित्य सन्मान"पुरस्काराने महाराष्ट्रभर परिचित असलेले वणी परिसरातील झोला या गावचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.अनंता सूर यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून प्रा.सूर यांनी अण्णा भाऊंच्या चरित्राचा आलेख उपस्थितांसमोर मांडला.संत तुकाराम महाराज आणि अण्णाभाऊ यांची तुलनात्मक मांडणी करतानाच सूर यांनी लिहिलेलं काटेरी पायवाट हे आत्मचरित्र, प्रतिशोध, जागल्या ही कादंबरी व अशा विविध साहित्यकृतींचा प्रवास त्यांनी उलगडून दाखवला. 
     वीर भगतसिंग विद्यार्थी अभ्यासिकेमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर होते. विशेष अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे  कार्याध्यक्ष विनोद बोबडे होते.  प्रास्ताविक मंगेश खामनकर, सूत्रसंचालन आशाकला कोवे, मारोती जिवतोडे तर आभार प्रदर्शन अमर डाहुले यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन नितीन मोवाडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण काकडे,  दत्ता डोहे, प्रदीप बोरकुटे, वसंत थेटे, सुरेंद्र घागे,सुभाष गेडाम, शुभम कडू यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments