ADvt

वणी व मारेगाव तालुक्यात मंडल यात्रेचे आगमन


वणी :- सुरज चाटे

     दिनांक  7 ऑगस्ट मंडल दिनाच्या औचीत्याने OBC (VJ, NT, SBC) जनजागृती अभियानांतर्गत विदर्भातील सात जिल्ह्यात समाजप्रबोधन करण्यासाठी 30 जुलै ते 6 ऑगस्ट 2023 करिता यात्रा निघाली असुन, दरम्यान यात्रा मारेगाव व वणी तालुक्यात दिनांक 4 ऑगस्ट ला आगमन करीत आहे. 
     मंडल यात्रेच्या निमित्ताने 1) सर्व जातींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. 2) ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतीगृहे व 21,600 विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना लागू झाली पाहिजे. 3) सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमांना 100% फी माफी योजना लागू करावी. 4) महाज्योती संस्थेस 1000 कोटी रुपयाचा निधी मिळाला पाहिजे. 5) इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटीचा निधी मिळाला पाहिजे. 6) इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे सर्व जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय, अधिकारी व ओबीसी भवन निर्माण झाले पाहिजेत. 7) इतर मागास बहुजन कल्याण विभागाला 30,000 करोड रुपयाचा निधी मिळाला पाहिजे. 8) तात्काळ  शिक्षक भर्ती झाली पाहिजे. 9) शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. 10) स्वामीनाथन आयोग लागू करा. 11) आमदार/खासदार यांच्या प्रमाणे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.या प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या जाणार आहे. मंडल यात्रेच्या आगमना निमित्त वणी तालुक्यातील नायगाव, पुनवट, पुरड, शेलू, चारगाव चौकी, केसुरली, चिखलगाव येथे तर मारेगाव तालुक्यातील मांगरूळ, करणवाडी, बोटोनी या गावात मंडल यात्रेचे स्वागत केले जाणार आहेत, तसेच वणी येथील "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ दु. 12:00 वाजता" तर "मारेगाव येथील मार्डी चौकात दु. 2:00 वाजता" स्वागत व सभा होणार आहे.""* तरी वणी व मारेगाव तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान ओबीसी महिला समन्वय समिती, सन्मान स्त्री-शक्ती फाऊंडेशन, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती, वणी- मारेगाव - झरी, जि. यवतमाळ यांच्यावतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments