वणी :- सुरज चाटे
यवतमाळ काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इजहार ग्यासुद्दीन शेख वरील एका पक्षाचा पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात सुडबुद्धिने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याकरिता एन एच फाऊंडेशन वणी यांचे कडून दिनांक 14 ऑगस्ट 2023 ला वणी उपविभागीय पोलीस अधिकारी निवेदन देण्यात आले.
दिपक चौपाटी येथे दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी घडलेली मारहाण प्रकरणात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख यांच्यावर वणी पोलीस स्टेशन मध्ये खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असुन ह्या मारहाण प्रकरणामध्ये इजहार शेख यांचा तिळमात्र संबंध नसुन जेव्हा ही पटना घडली तेव्हा इजहार शेख हे वणी शहरात उपस्थित नव्हते. इजहार शेख यांचा समाजात व राजकारणात वाढत चाललेला दबदबा व त्यांना बदनाम करण्याच्या सुडबुध्दीने त्यांच्यावर खोटे गुन्हे वणी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आले आहे. तरी इजहार शेख यांच्यावर वणी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे परत घेण्यात यावी अशा मागणीचे निवेदन एन एच फाऊंडेशन वणी यांनी दिनांक 14 ऑगस्ट 2023 ला वणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले यावेळी एन एच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्रांत चचडा, निलेश बेलेकर, कुणाल लोणारे सौरभ खडसे, सचिन पाटील हर्षल शेंडे, अनुप चटप, अखिल गोलाईत, राजु गोलाईत, महेश गिरटकर, बंटी सहानी, हनी बत्रा आदी उपस्थित होते.
0 Comments