वणी :- सुरज चाटे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना उपतालुका प्रमुख आयुष रोहितदास ठाकरे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शिरपूर, येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरणाच्या रक्षराणासाठी वृक्षारोपण हाच सर्वोत्तम पर्याय आहे. पर्यावरणाचा आपल्याला आरोग्याशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे परिसराच्या विकासासोबतच आरोग्यालाही प्रथम प्राधान्य देऊन आम्ही हे काम हाती घेतले आहे. वृक्षाचे ख-या अर्थाने जतन झाल्यास व ती वाढवल्यास शुद्ध हवा मिळेल व त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. केवळ झाडे लावून नाही तर तर ती जगवली देखील पाहिेजे तेव्हाच वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी झाला असे म्हणता येईल. असे प्रतिपादन शिवसेना उपतालुका प्रमुख वणी आयुष ठाकरे यांनी केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रम घेण्यात आले त्यातलाच एक भाग म्हणुन शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करून उद्धवसाहेबांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसैनिक गावकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments