वणी :- सुरज चाटे
विनोदकुमार आदे यांचा आज जन्म दिवस
त्यांचा जन्म 26 जुलै 1984 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील नवरगांव (धरण) या गावी झाला. घरची परिस्थिती जेमतेम त्यात वडील सुतार काम करत आई मोलमजुरी करत वर्ग पहीलीचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवरगांव येथे झाले असून पुढील शिक्षण मारेगांव व वणी येथे झाले 1992 ला नवरगाव सोडून मारेगांव येथे स्थायिक झाले नवरगाव येथील प्रसिद्ध मुर्तिकार विनायक शतपलक यांच्या मुर्तिकलेने प्रेरित होऊन विनोदकुमारने मुर्तिकला अवघत करून मुर्तिकला क्षेत्रात आज रोजी वणी उपविभागात चांगली छवी निर्माण केले व हळूहळू ईतर कला ही अवघत करत विविध कलेचे धनी म्हणून आज यांची ख्याती आहेत.
त्यामुळेच विनोदकुमार परिसरातील सर्वपरिचित असं नावं आहे. अगदी लहानपणापासूनच त्यांना कला क्षेत्रात आवड असल्याने त्यांनी आपल्या जिद्द आणि मेहनतीने विविध कलेत लौकिक मिळवलेला आहे. हस्तकला, चित्रकला, मूर्तिकला, रांगोळी, गीतकार, कवी, निवेदक, गायक, अभिनय, अश्या विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. सध्या ते "वणी न्यूज एक्सप्रेस" या आघाडीच्या वृत्तवाहिनीचे संपादक म्हणून काम करत आहेत. विनोदकुमार एक कलावंत आहेच पण सोबतचं त्यांनी सामाजिक कार्याचा वसाही सांभाळला आहे. त्यांनी विविध सामाजिक संघटनासोबत काम केले. स्वतः सामाजिक संघटना निर्माण केली. 2002 मध्ये मारेगाव येथे स्थापन झालेल्या श्री. गुरुदेव सत्संग सेवा समिती च्या माध्यमातून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, कला महोत्सव, आरोग्य शिबीरे, कवी संमेलनांचे मोठ्या थाटामाटात आयोजन केले.स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिवस असो की, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो, मारेगावच्या जिजाऊ चौकात विनोदकुमार निःस्वार्थ वृत्तीने रांगोळी साकारायचे.या त्यांच्या विविध क्षेत्रातील निःस्वार्थ कार्यामुळे त्यांचा अनेक मंचवरुन गौरव करण्यात आला."शुशगंगा पॉलीटेक्निक कॉलेज" मध्ये मायनिंग शाखेत शिकत असतांना 2013 मध्ये त्यांनी तयार केलेल्या सायन्स मॉडेलला नंदुरकर अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ येथे प्रथम तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विज्ञानाच्या साह्याने स्वयंपूर्ण वणी शहर ही प्रतिकृती राज्यस्तरावर कौतुकाचा विषय बनली होती.कोव्हीड 19 च्या काळातही शासनाच्या नियमांचे पालन करुन वणी येथील जैताई मंदिराच्या बाजूने दुर्गा उत्सवात त्यांनी कोरोना आजाराशी संबंधित जनजागृतिपर तयार केलेला देखावा हा वणीकरांच्या कुतूहलाचा विषय ठरला होता.
वणी उपविभागात
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी प्रज्वलन (कलामहोत्सव) याचे मोठ्या स्तरावर आयोजन करून कलावंताच्या कौशल्याला न्याय देण्यासाठी मंचही उपलब्ध करून दिला.नुकताच आदिवासी साहित्य परिषदेत त्यांचा टुकार काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला तसेच कथा लेखन, लघुचित्रपट निर्मिती, स्वतःचा कुमार रेकाॅर्डिंग व फिल्म मेकिंग स्टुडीओ असून स्वतःचा आर्केस्ट्रा देखील आहेत.
हाॅटेलात कपबश्या धुणारा, उन्हातान्हात रेती मसाला कालवणारा, भंगार गोळा करणारा......
विनोदकुमार यांचा प्रवास हा असा शून्यातून विश्वनिर्मितीकडे जाणारा प्रवास आहे. त्यापाठीमागे त्यांची प्रचंड मेहनत आहे.
अश्या प्रयत्नशील युवा कलावंत विनोदकुमार आदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपली पुढील वाटचाल यशाची असो....
0 Comments