ADvt

नृसिंह व्यायाम शाळा एक उज्वल भविष्यासह सुदृढ शरीर घडविणारी संस्था....आ. बोदकुरवार....



वणी: सुरज चाटे

     अनेक दिवसांपासून वणीतील नृसिंह व्यायाम शाळेच्या पटांगणात चिमुकल्यांसाठी लाठीकाठी व मर्दाणी खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे, दरम्यान अंगीकृत काही ना काही सुप्त गुण असावे व वेळ प्रसंगी आपल्यावर कुणी वरचढ होऊ नये या दृष्टीकोनातून मर्दानी डाव आपल्याकडे असणे गरजेचे असते, विशेष म्हणजे महिला या बाबतीत या ठिकाणी अग्रेसर असल्याचे दिसते आहे. 

    मर्दानी खेळाचे प्रशिक्षण विशेष म्हणजे हे प्रशिक्षण एक महिला चिमुकली कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे सह नृसिंह व्यायाम शाळेचे पदाधिकारी यांनी सहकार्य दर्शवित प्रशिक्षण देत आहे, रोज या प्रशिक्षणात 80 ते 90 विद्यार्थी स्वसंरक्षणाचे धडे गिरवत आहे. रोज संध्याकाळी 5.30 ते 7.30 या कालावधीत हे प्रशिक्षण होत असते. दिनांक 02 जुलै 2023 ला वणीतील प्रसिद्ध असलेल्या श्री नृसिंह व्यायाम शाळेच्या पटांगणात चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे साहेब, वणी पोलीस स्टेशन चे ठाणेदार अजित जाधव साहेब, सामाजिक कार्यकर्ते लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर, नामवंत विधिज्ञ ऍड निलेशदादा चौधरी, नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोदजी इंगोले, सुभाष तिवारी, अशोक घुगुल, देवरवजी गव्हाणे, पुरुषोत्तम आक्केवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार बोदकुरवार यांनी आपले अध्यक्षस्थानावरून विचार व्यक्त करताना सांगितले की, नृसिंह व्यायाम शाळा एक उज्वल भविष्यासह सुदृढ शरीर घडविणारी संस्था आहे व मुला मुलींना कौतुकाची थाप देत शुभेच्छा दिल्या. 

     वणी तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राजु देवरावजी गव्हाणे यांची मुलगी तेजस्वीनीला बालपणापासूनच साहसिक खेळाची आवड आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून तिने नृसिंह आखाड्यात लाठीकाठी व इतर साहसिक खेळांचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर पुढील प्रशिक्षण तिने नागपूर येथील सुप्रसिद्ध लाठीकाठी वस्ताद आप्पासाहेब भोसले यांच्या ताजराज हिरा आखाडा येथे घेतले आहे सोबतच तिने आपली चमु बनवून तिने स्वतः घेतलेले गुण दुसऱ्या मुला मुलींना ती देत असुन त्यामुळे शरीर सुदृढ व मर्दानी डाव अंगीकृत असते, यातून बऱ्याच प्रमाणात विद्यार्थी तिच्याकडून प्रशिक्षण घेत आहे.

     तेजस्विनीला लाठिकाठीसह तलवारबाजी, दांडपट्टा, बाना, भालाफेक आदी साहसिक खेळात निपून आहे. याशिवाय कराटे या खेळातही ती ब्लू बेल्ट आहे. विविध साहसिक खेळासह ती वकृत्व, इतर कला व सामाजिक कार्यतही ती अग्रेसर असते. मुलींनी सुद्धा मर्दानी खेळाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे हे तेव्हाचे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी बोलून दाखविले होते त्यांनी स्वतः या केंद्राला भेट देत प्रशिक्षणार्थी तथा युवा प्रशिक्षक तेजस्विनीची पाठ थोपटली होती.
     यावेळी तेजस्विनी हिने नृसिंह व्यायाम शाळेचा इतिहास थोडक्यात पाहुण्यांसमोर मांडला, तिने आपल्या शाळेतून होऊन गेलेले वस्ताद यांच्याबद्दल माहिती दिली, तसेच संस्थेविषयी सांगतांना तिने सांगितले की या नृसिंह व्यायाम शाळेला दुर्लक्षित केल्या जात होते मात्र आम्ही इथे प्रशिक्षण सुरू करून जणु याला संजीवणीच मिळाल्याचे आम्हाला दिसत आहे यात नृसिंह व्यायाम शाळेच्या संपूर्ण मंडळींचा मौलिक सहभाग आम्हाला वेळोवेळी मिळत असल्याचे तिने यावेळी सांगितले, कार्यक्रमाचे संचालन राजु गव्हाणे यांनी केले तर आभार तेजस्विनी राजु गव्हाणे हिने मानले. कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती दरम्यान चित्तथरारक प्रात्याक्षिक पाहुन सगळ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

Post a Comment

0 Comments