वणी :- सुरज चाटे
वणीतील जवळच वसलेले लालगुडा गावातील२१ वर्षीय युवकाने आपल्या दुकानातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 12 जुलै 2023, बुधवारी सकाळी ७ वाजता चे सुमारास उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रोशन दिगांबर बावणे (२१) रा. लालगुडा असे मृतकाचे नाव आहे. वणी शहरातील जत्रा मैदान परिसरातील हनुमान मंदीर समोर रोशन बावणे यांचे फर्निचरचे दुकान आहे. फर्निचरचे साहित्य असल्याने रोशन दुकानातच रात्री झोपत होता. मंगळवारी रात्री रोशन दुकानात झोपला होता तर एक व्यक्ती दुकानाचे बाहेर झोपला होता. बुधवारी सकाळी दुकानाचे बाहेर झोपलेला व्यक्ती दुकानाचे आत गेला असता त्याला रोशन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती रोशन च्या वडिलांना देण्यात आली असता परिवारातील सदस्यांसह परिसरातील लोकांनी एकच गर्दी केली. या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मात्र रोशन ने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.
0 Comments