ADvt

मित्रहो समृद्धी महामार्गाने प्रवास करत आहे .... पण थोडं जपुन



बुलढण्याजवळ खाजगी बसचा अत्यंत भिषण अपघात :- 25 प्रवाश्यांचा जागीच मृत्यु तर उर्वरित गंभीर जखमी.....

मित्रांनो आपण महागड्या गाड्या घेतो मग वेळेवर मेंटेनन्स पण अति महत्वाचे ..... जीवनाशी खेळ नको...

यवतमाळ :- सुरज चाटे

     बुलढाण्यात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी बस समृद्धी महामार्गावर दिनांक 01 जुलै 2023 ला पहाटे च्या दरम्यान (30 जुन च्या मध्यरात्री) पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागली. आगीने भराभर पेट घेतल्याने या बसमधून प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.



     समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना काही नव्या नाही मात्र हा अपघात अतिशय मोठा असुन यात 25 निष्पाप जीव गेले आहे, हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नागपूरवरून खासगी प्रवाशी बस ही पुण्याला जात होती. सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली.
     
     दरम्यान सिमेंट रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले, प्रवाश्यांना बसमधून बाहेर पडता न आल्याने यात ही मोठी जीवितहानी झाली असल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे. मात्र या मोठ्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असुन संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. 
     
     मित्रहो आपण इतक्या महागड्या गाड्या घेतो मात्र त्याच्या मेंटेनन्स कडे दुर्लक्ष करतो आणि तेच दुर्लक्ष आपल्या जीव जाण्याचे कारण सुद्धा ठरू शकते, त्यामुळे गाड्यांचे मेंटेनन्स सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आणि समृद्धी महामार्गावर असो किंवा इतर ठिकाणी वाहन सुद्धा तितकेच व्यवस्थित पणे व नियमात चालविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments