ADvt

आगळा वेगळा उपक्रम करून वाढदिवस साजरा.



वृक्षारोपण करून केला जन्मदिवस साजरा....

माजी नगरसेवक धीरज भाऊ पाते यांचा स्तुत्य उपक्रम...

     वणी :- सुरज चाटे वणी 

           वणी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा उत्कृष्ठ व्यावसायिक धिरजभाऊं पाते यांनी आपल्या जन्मदिनानिमित्य कोणताही आगाऊ खर्च न करता निवांत स्थानी वासेकर लेआऊट परिसरात वृक्षारोपण केले वृक्षारोपणाचे फायदे व त्यामुळे होणारे जनतेला विविध फायदे या दृष्टिकोनातून वृक्षारोपण काळाची गरज लक्षात घेत आजचा जन्मदिनाचा दिवस त्यांनी वृक्षरोपणाकरिता दिला आहे. 


     सरळ साधी राहणी व मनाचा राजा माणुस अशी ख्याती असणारे वणी नगर परिषदेच्या निवडणुकीत किंग मेकर असलेले माजी नगरसेवक धीरज भाऊ पाते यांनी आपला आगळा वेगळा वाढदिवस साजरा करीत युवकांना एक वेगळी संकल्पना या दृष्टीकोनातून देत प्रत्येकाने एक झाड लावून त्याचा फायदा आपल्या मुलाबाळांना नक्की होणार असल्याचे यावेळी बोलत वृक्षारोपणाचा समजुपयोगी निर्णय घेत आपल्या जन्मदिनाचा वाजा गाजा न करता अतिशय साध्या व सरळ पद्धतीने आपला जन्मदिवस साजरा केला आहे, धीरजभाऊ हे समजुपयोगी व जनसेवेच्या विविध कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असतात, ते या पुढे सुद्धा ते अविरत वृक्षारोपणाची मोहीम मित्रपरिवारासहित सुरू ठेवणार असल्याचे बोलून दाखविले. यावेळी धीरजभाऊ पाते यांचा मित्रपरिवार यांनी मौलिक सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments