आर टी आय संघटक पोटे यांचा SDO यांना इशारा...
वणी :- सुरज चाटे
वणीतील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यांची विल्हेवाट व अतिक्रमनावर कारवाई व्हावी या मागणी करिता वारंवार निवेदन देऊन सुद्धा शासनाला जाग येत नसुन दिनांक 21 जुन 2023 मुजोर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी दादाजी पोटे यांचा उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदनाद्वारे लोटांगण आंदोलनाचा इशारा.
वणीतील बरेचशे रस्ते अतिक्रमानाच्या अजगराने गिळंकृत केले असुन यामुळे रस्ता अरुंद झाला असुन यावर मोठमोठ्या।खड्यांनी जन्म घेतला आहे त्यातून अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही दरम्यान वारंवार निवेदन व तक्रारी देऊन सुद्धा प्रशासनाला जाग येत नसुन त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आता दादाजी लटारी पोटे, आर टी आय संघटक व प्रचारक यवतमाळ जिल्हा यांनी आंदोलनाचा मार्ग घेतला असुन जर जनतेचे प्रश्न सुटत नसतील तर काय फायदा? असा सवाल उपस्थित करत लोटांगण आंदोलनाची कार्यालयीन परवानगी देण्यात यावी व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
0 Comments