वणी :- सुरज चाटे
मारेगाव तालुक्यातील सिंदी (महागाव) येथील एका शेतकरी पुत्राने आपल्या राहत्या घरी विषाचा घोट घेत आत्महत्या केल्याची घटना ८ जून 2023 रोजी सकाळी दहा वाजेदरम्यान घडली.
विजय नानाजी खंडाळकर (४०) रा.सिंदी (महागाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव असून त्यांचे वडिलांच्या नावे महागाव येथे तीन एकर शेती असल्याची माहिती आहे.
दरम्यान आज सकाळी १० वाजे दरम्यान त्यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. सदर बाब कुटुंबीयांचे लक्षात येताच त्यांनी विजय यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार दाखल केले असता त्यांची प्राणज्योत मालवली. विजय यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
मृतक विजय यांचे पश्चात पत्नी वैशाली, एक मुलगी,एक मुलगा, वडील असा बराच मोठा आप्त परिवार आहे.घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
0 Comments