ADvt

महाराष्ट्र दिनी कोयला रोको आंदोलन



महाराष्ट्र दिनाचा निषेध :-  1 मे ला उमरेड कोळसा खाणीत कोयला रोको

वणी :- सुरज चाटे

     विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत विदर्भ मिळवू औंदा या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने थेट केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या कोळसा खनिजाचे उत्पादन करून वीज/ऊर्जा निर्मितीकरीता देशभर जाणारा कोयला दिनांक 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून उमरेड जवळील कोळसा खाणी मधून बाहेर जाणारा कोयलो रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून हे आंदोलन त्या दिवशी दुपारी 12 वाजता सुरू होईल व स्वातंत्र्याच्या एलगाराचे रणशिंग फुंकले जाईल.

     कोयला या खनिजाने उत्पादन महाराष्ट्रातील खास करून विदर्भातील नागपूर यवतमाळ व चंद्रपूर याच जिल्ह्यात होते व त्या आधारे 6300 मेगावॅट वीज विदर्भात तयार होते व त्यापैकी विदर्भाला केवळ 2200 मेगावॅट वीजच वापरावयास मिळते विदर्भात 58% शेतीपंपाचा अनुशेष असून 6 ते 12 तास लोड शेडिंग सहन करावी लागते व प्रदूषणामुळे श्वासोच्छवासाचे फुफुसाशी संबंधित सर्व आजार विदर्भातील प्रदूषित जिल्ह्यात आहे दिल्ली व हरियाणा येथील हृदयरोग तज्ञांची चमू 4 वर्षाआधी विदर्भात येऊन गेली असून त्यांनी पाच वर्षात प्रदूषण नियंत्रणात आले नाही तर देशात सर्वाधिक हृदयरोगी चंद्रपूर जिल्ह्यात व विदर्भात मिळतील असे जाहीरपणे सांगितले होते.
    स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची लढाई गेल्या 118 वर्षापासून सुरू असून ती 31 डिसेंबर 2023 पर्यंत कायमची निकाली काढण्याच्या दृष्टीने विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या 12 वर्षापासून आंदोलनाची मालिका सुरू ठेवली असून ही आरपारची लढाई समजून तिचा बिगुल वाजवण्याच्या दृष्टीने व 31 डिसेंबर 2023 पूर्वी करू किंवा मरू,जिंकू किंवा मरू या तऱ्हेने ही निकराची लढाई लढून विदर्भ निर्मितीचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचा निर्धार केला असून 19 डिसेंबर 2022 पासून शुरू हुई है जंग हमारी,लढेंगे जितेंगे लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ विदर्भ राज्य मिळवून घेऊ कटेंगे मगर हटेंगे नाही असा एल्गार करून आरपारची लढाई करून 31 डिसेंबर पर्यंत विदर्भ मिळवून विदर्भातील जनतेच्या स्वाधीन करण्याचा चंग बांधला आहे.
     महाराष्ट्र हे देशातील नंबर 1 चे कर्जबाजारी राज्य असून राज्यावर 6 लाख 60 हजार कोटीचा कर्जाचा डोंगर असून मार्ग,राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्ग यासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदला अदा करण्याकरता राज्य सरकारने एम.एस.आर.डी.सी.ला ६५ हजार कोटी चे कर्ज घेण्यास परवानगी दिलेली असून त्याला थकहमी (जामीन) राज्य सरकारने दिली आहे अप्रत्यक्षपणे हा बोजा राज्याच्या तिजोरीवर असून राज्याची वाटचाल दिवाळखोरी कडे आहे विदर्भातील जनता 100 वर्ष महाराष्ट्रात राहिली व ब्रह्मदेवाला जरी मुख्यमंत्री केले तरी विदर्भातील जनतेचे बरे होणे नाही म्हणून महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून सर्व आंदोलक त्या दिवशी काळ्या पट्ट्या,काळे वस्त्र व काळ्या टोप्या परिधान करून आंदोलनात सहभागी होतील.
राज्याच्या वार्षिक महसुली उत्पन्नापेक्षा वर्षभराचा खर्च भागवायला शासनाकडे सरासरी 25 हजार कोटी कमी आहेत व अर्थसंकल्प तुटीचा आहे त्यामुळे राज्यात सरसकट नोकरभरती बंद कारण पगार देण्याची सोय नाही व राज्याच्या बेरोजगारीची संख्या 66 लाखाच्या वर असून विदर्भातील बेरोजगारांची संख्या ही 14 लाखांच्या वर आहे व राज्यात अजामीतिला 2 लाख 55 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून प्रशासन कोलमडले आहे परिणामी योजनांची अंमलबजावणी करताना दप्तर दिरंगाई सुरु झालेली आहे म्हणून या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आणि ते म्हणजे "विदर्भाचे स्वतंत्र राज्य''
घटनेतील आर्टिकल 3 प्रमाणे विदर्भ राज्य निर्मितीचा अधिकार हा केवळ केंद्र सरकारचा व संसदेचा अधिकार आहे त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीने केंद्राशी संबंधित कोयला व खनिजाला कोयले रोको आंदोलन करून केंद्राला टाचणी टोचण्याचा प्रयत्न केला आहे तसेच विदर्भातील खासदार व केंद्रीय मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री यांना गावबंदी घोषित केली आहे विदर्भ राज्य निर्मितीचा घडी हळूहळू जवळ येत असून 31 डिसेंबर पर्यंत तीव्र आंदोलने करून या मागणीला विदर्भ राज्य निर्मिती करून पूर्णविराम देण्याचा संकल्प विदर्भ राज्य आंदोलन समिती ने सोडला असून "दुखी मन मेरे सुनो मेरा कहना,"जहा नही चैना वहा नही रहना" अशी स्वातंत्र्याची घोषणा केली वणी येथिल विश्राम गृहात संपन्न झालेल्या बैठकीला विदर्भाचे नेते नेते ऍड वामनराव चटप प्रा पुरुषोत्तम पाटील,रफिक रंगरेज,राहुल खारकर,राजू पिंपळकर,बाळासाहेब राजूरकर,नामदेवराव जनेकर,देवा बोबडे,होमदेव कनाके,धीरज भोयर,संजय चिंचोळकर,अनिल टोंगे,मोहन हरडे,काशीनाथ देऊळकर,शशिकांत नक्षीने,दिनेश रायपूरे,विजय बोबडे,रामजी महाकूलकर,पांडुरंग पंडिले,राम मुडे सर,अशोक चौधरी,नीलिमा काळे,कलावती क्षीरसागर,नारायण मांडवकर,सुभाष वैद्य,प्रभाकर उईके,योगेश बेलेकर,सिद्धार्थ ताकसांडे इत्यादी विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments