ADvt

त्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अखेर वणी पोलिसांनी ठोकल्या बेडया....



शिवाजी गार्डन येथे झाला होता राडा :- डोळ्यात तिखट टाकून लोखंडी रॉडने मारहाण.....

वणी :- सुरज चाटे

     दिनांक १०/०४/२०२३ रोजी फिर्यादी नामे राकेश शंकर शेवंतावार वय २७ वर्ष रा. शास्त्री नगर वणी यांनी पो.स्टे. ला तकार दिली की, त्याचा मित्र कुनाल बुर्रेवार वय २८ वर्ष, महेश दंतलवार असे दिनांक ०९/०४/२३ चे रात्री ०९/०० वा. लॉर्ड्स बार वणी मध्ये बसुन मजाक सुरू असतांना नामे अरूण तिरानकर वय २५ वर्ष यांनी अरेरावी करून निघुन गेला व रात्री १० / २५ वा. चे सुमारास त्यांने त्याचा मित्राचे फोन वरून शिवाजी गार्डन वणी येथे बोलाविले वरून वरील इसम तीचे तीथे गले असता तीथे समीर मुन, अरूण तीरानकर व त्याचे सोबत दोन तीन मुले बोलत असतांना राजु झगडमवार याचे डोक्यावर समीर मुन यांने जुन्या भांडणाचे कारणावरून लोखंडी रॉड ने मारून गंभीर जखमी केले मी सोडण्यास गेलो असता अरूण तीरानकर यांने आमचे डोळयात तीखट टाकुन मला डोक्यावर पाठीवर मारहाण केली अशा रिपोर्ट वरून वरील प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला होता.
     सदर आरोपी हे गुन्हा करून फरार झाले होते त्यांचा कसोसीने शोध घेवुन त्यांना दिनांक १३/०४/२०२३ रोजी आरोपी १) अरूण बळवंत तिरानकर वय २३ वर्ष, २) प्रणय उर्फ समीर रविन्द्र मुन वय २१ वर्ष रा. सम्राट अशोक नगर वणी यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
     सदरची कार्यवाही मा.डॉ. पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ. वणी, यांचे मार्गदर्शनात पो.नि प्रदिप शिरस्कर ठाणेदार पोलीस स्टेशन वणी सहायक पोलीस निरीक्षक माधव शिंदे, सहायक फौजदार / सुदर्शन वानोळे, पोहवा / सुहास मंदावार, पोना / हरीन्द्रकुमार भारती पोकों / पुरूषोत्तम डडमल, पोकॉ/ सागर सिडाम यांनी केली पुढील तपास पोउपनि / प्रविण हिरे, व पोकों / वसीम खान हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments