वणी :- सुरज चाटे
होळी, धुलीवंदन सण निमीत्य शांततामय वातावरणात पार पाडण्याचे दृष्टीने मा. पोलीस अधिक्षक सा. यवतमाळ यांनी नमुद सणा संबंधाने दिलेल्या सुचना प्रमाणे पो.स्टे.ला पथक तयार करून पो.स्टे. परीसरात त्या अंतर्गत दिनांक ०४/०३/२०२३ पासुन ते आजपावेतो अवैद्य धंदयावर विशेष मोहीम राबवुन फौजदारी दंड प्रक्रिया संहीता कलम १४४ (१) अन्वये पो.स्टे हद्दीतील एकुण ०६ अवैध्य व्यावसायीक यांना होळी सणानिमीत्त हद्दपार करण्यात आले. महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अंतर्गत एकुण १० केसेस करण्यात आल्या असून २३,४८१ / रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.. तसेच महाराष्ट्र जुगार प्रति अधिनियम अंतर्गत एकुण ०५ केसेस करण्यात आले असुन ६३७० / रू मुददेमाल जप्त करण्यत आला आहे. तसेच नमुद ची मोहीम ही आगामी सणानिमीत्त सुरू राहणार असुन उदयीक दिवशी अवैध्य व्यवसाय करणारे तसेच दारू पिवुन वाहन चालविणारे यांचे विरूद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई मा.डॉ. पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ. वणी, यांचे मार्गदर्शनात, पो.नि प्रदिप शिरस्कर ठाणेदार पो.स्टे. वणी, मार्गदर्शनात, डी.बी पथक चे सपोनि माधव शिंदे, सफी./ १५९७ सुदर्शन वानोळे पोहवा / १२७४, सुहास मंदावार, पोना / ६८७ हरीन्द्रकुमार भारती, पोकॉ/ २०६० सागर सिडाम, पोकॉ/ ४४७ पुरूषोत्तम डडमल हे करीत आहेत.
0 Comments