ADvt

अन अर्ध्यावरती डाव मोडला.. अधुरी एक कहाणी




आई वडिला विना अवघ्या एक वर्षाचे बाळ झाले पोरके

वणी वरोरा रोडवर भिषण अपघातात डॉक्टर दाम्पत्यांचा मृत्यू....

वणी :- सुरज चाटे

     वणी वरोरा रोडवर, वरोऱ्याहून वणीच्या दिशेने येत असलेल्या वणीतीलच एका डॉक्टर दाम्पत्याच्या चारचाकी वाहनाला ट्रक ने धडक देऊन यात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर झाल्याने त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्याकरिता घेऊन जात असताना अर्ध्यावरच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने डॉक्टर दाम्पत्यांनी जगाचा निरोप घेतल्याची घटना मनाला चटका लावून देणारी घडली असून ही घटना दिनांक 22 मार्च 2023 ला घडली. 
        वरोरा - वणी रोडवर भीषण अपघात झाला यात वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दोन ते तीन दिवसा अगोदरच रुजु झालेल्या डॉ. अश्विनी गौरकार- झाडे, वय अं 31 वर्ष, रा शाळा क्रमांक 5 वणी यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर अपघातात गंभीर असलेल्या डॉ अतुल गौरकार यांना चंद्रपूर येथील दवाखान्यात घेऊन जात असतेवेळी मधातच त्यांनी जगाचा निरोप घेतला डॉ अतुल हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कर्तव्य बजावत होते.   
     डॉक्टर दाम्पत्य MH-34- AM- 4240 या कार ने वणीकडे येत होते तर ट्रक क्रमांक MH- 34- BZ- 2996 हा ट्रक भरधाव वेगात होता. नेमका अपघात झाला कसा हे समजायला मार्ग नसून मात्र, अपघात भीषण होता, यावेळी स्थानिकांनी गर्दी केली होती, दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस दाखल झाले व जखमींला तातडीने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते मात्र पतीने सुद्धा जगाचा निरोप घेतल्याने अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी असेच काहीसे चित्र दिसून आले असून ही घटना मनाला चटका लावून देणारी असल्याने अवघ्या एका वर्षाचे बाळ आई वाडीलाविना पोरके झाले आहे. 
     घटनेचा पुढील तपास पोलीस करीत असून घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  मृतक डॉ. अश्विनी व मृत अतुल गौरकार यांना एक वर्षाचे लहान बाळ आहे, तिच्या मागे मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे. 

Post a Comment

0 Comments