वणी :- राजु गव्हाणे
श्री कानिफनाथ महाराज जयंती निमित्त दिनांक 11/03/2023 रोजी गोकुळ नगर, वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व रक्तदात्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आवश्यक ते योगदान द्यावे असे आवाहन अयोजकांनी केले आहे.
सरोदे समाज संघटनेकडून नेहमीच नित्य नियमाचे समाजुपयोगी उपक्रम नेहमीच सुरू असते रक्ताची गरज लक्षात घेता श्री कानिफनाथ महाराज जयंती निमित्त दिनांक 11 मार्च 2023 ला दुपारी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन वणी येथील गोकुळ नगर वणी येथे आयोजन केले आहे जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments