ADvt

ओव्हरटेक च्या नादात दोन इसम जागीच ठार...



जलदिसे देर भली :- म रा प म ची बस पलटी, प्रवासी जखमी...

चारचाकी वाहनाला ओव्हर टेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसची जोरदार धडक...

चंद्रपूर :- मनीष रक्षमवार

     ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या बस  च्या धडकेत 2 तरुण जागीच ठार झाले असून बस पलटी झाली, त्यात बस मधील प्रवाश्याना किरकोळ जखमी झाले आहे.  आज दिनांक 13 फेब्रुवारी 2023 ला सकाळी 10 वाजताच्या सुमारस स्कुटी वरून मुलला आपल्या दुचाकी ने येत असलेले 27 वर्षीय प्रफुल गुरुनुले आणि 31 वर्षीय संदीप कोकोडे हे दोघेही या अपघातात जागीच ठार झाले असून बस मधील काही प्रवाश्यांना किरकोळ मार लागला आहे. 
     महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम.एच. 07 सी 9158 ही मुल वरून चामोर्शी ला जात असताना  मुल वरून 2 कि.मी. वर असलेल्या उमानदी च्या पुला अगोदर असलेल्या एका छोट्या पुलाजवळ दुचाकी स्वाराने समोर असलेल्या चारचाकी वाहणाला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. त्यात दोन्ही दुचाकिस्वार जागीच ठार झाले. तर बस मधील प्रवासी मात्र सुखरूप बचावले, दुचाकी स्वारांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस पलटी झाल्याची माहिती बसच्या चालकांनी आमच्या प्रतिनिधी ला दिली असून बस मधील काही प्रवश्याना किरकोळ मार लागला आहे. या घटनेची माहिती 
 पोलीसाना होताच घटना स्थळावर धावून आले मृतदेह  शवविच्छेदना करिता उपजिल्हा रुग्णालय मुल येथे पाठवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments