ADvt

चक्क बापूने तयार केला बनावट दारू बनविण्याचा कारखाना...



अन मग बनावट दारूच्या कारखाण्यावर पोलिसांची धाड....

देशी विदेशी :- बनावट दारू बनविण्याचा प्रयत्न फसला, एकास अटक...

चंद्रपूर :- मनीष रक्षमवार

     चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या मूल तालुक्यातील चितेगाव येथील बनावट दारुचा कारखान्याचे (factory) प्रकरण ताजे असतानाच चक बोर्डा येथे सुद्धा असाच प्रकार समोर आला. एका घरात देशी-विदेशी बनावट मद्य तयार केले जात होते. या कारवाईत शशिम प्रेमानंद कांबळे याला अटक केली आहे.  एक लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन पुढील तपास पोलीस करीत आहे. 


     चकनिंबाळा मार्गावरील चक बोर्डा  गावातील कांबळे यांच्या शेतातील घार मध्ये बनावट देशी-विदेशी मद्य तयार केले जात असल्याचा माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानंतर आज शुक्रवारला या घरावर छापा टाकण्यात आला. घटनास्थळी दारु तयार करण्याचे साहित्य हाती लागले. देशी दारुच्या तीनशे रिकाम्या बॉटल मिळाल्या. दारुबंदी हटून जवळपास दीड वर्षांचा कालावधी होत आहे. दारूबंदी बनावट दारु यायची. त्यामुळे अनेकांचे जीव गेले. दारुबंदी हटविण्यात याच बनावट दारुचा सुद्धा एक मुद्दा होता. मात्र आता दारु सुरु झाल्यानंतर बनावट दारुचे कारखाने जिल्ह्यात सापडत आहे. लगतच्या गडचिरोली आणि ग्रामीण भागात ही दारु पोहचती केली जाते. उत्पादन शुल्क विभागाची एका महिन्यातील ही दुसरी कारवाई आहे. परंतु या रॅकेटचा (racket) मोह्क्या त्यांच्या हाती अद्याप लागला नाही.

Post a Comment

0 Comments