वणी :- सुरज चाटे
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्त पथकांना अवैध धंदयाची गोपनिय माहोतो काढुन प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या
दिनांक २७/०१/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पो.स्टे. वणी हददीत असतांना गोपणीय बातमीदाराकडुन खात्रीलायक माहिती मिळाली की, मुनाल नवनाथ बेलेकर हा साने गुरुजी नगर फाले लेआउट वणी येथे आपल्या राहत्या घरासमोरील गल्लीत एका सुझुकी सेलेरो वाहनातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करीत आहे. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने सदर बाबतीत वरिष्ठांना अवगत करुन प्राप्त आदेशाप्रमाणे गोपणीय माहितीची खात्री केली असता प्राप्त माहिती प्रमाणे साने गुरुजी नगर फाले लेआउट वणी येथे एका मोकळया जागेत एक पांढऱ्या रंगाचे मारोती सुझुकी सेलेरो वाहन क्रमांक एम एच २९ ए आर ५४६८ व त्याचे बाजुस एक इसम उभा असलेला दिसल्याने त्यास त्याचे नांव पत्त्याबाबत विचारपुस केली असता त्याने आपले नांव मुनाल उर्फ मुन्ना नवनाथ वेलकर वय ३४ वर्ष, रा. वार्ड क्रमांक ६ फाले लेआउट साने गुरुजी नगर वणी सांगीतल्यावरुन त्यावरुन त्याचे वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता १) मजा १०८ झेन हुक्का शिशा तंबाखु ५०० ग्रामचे ७ डब्बे २) मजा १०८ झेन हुक्का शिशा तंबाखु २०० ग्रामचे ४२ डब्बे, ३) इंगल हुक्का शिशा संगंधित तंबाखु पाऊ ६ नग, ४) तुलसी न. १ पन्नी ३० नग, ५) एक मारोती सुझुकी सेलेरो वाहन असा एकुण २,६३,६७०/- रुपये चा मुददेमाल व आरोपी मुनाल उर्फ मुन्ना नवनाथ बेलकर वय ३४ वर्ष, रा. वार्ड क्रमांक ६ फाले लेआउट साने गुरुजी नगर वणी यास ताब्यात घेवून अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांना सदर बाबतीत माहीती देवून पाचारण केले असता दिनांक २८/०१/२०२३ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्री घनश्याम दंदे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यवतमाळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी नामे मुनाल उर्फ मुन्ना नवनाथ बेलकर यांचे विरुद्ध पोस्टे वणी येथे भादंवि कलम १८८.२७२.२७३.३२८. अन्न सुरक्षा मानके कायदा २००६, नियम व नियमणे २०११ चे कलम २६ (२),२७.३० (२) (अ) कलम ५९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हयात कोटेही असा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु अथवा गुटखा विक्री होत असल्यास किवा त्याचा साठा करून ठेवला असल्यास त्याबाबतची माहीती स्थानिक गुन्हे शाखेला कळविण्यात यावी असे आवाहन करण्यात येते.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, श्री. प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पोउपनि योगेश रंधे, पोहवा/ उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, पोना/ सुधीर पांडे, चापोहवा/ नरेश राउत सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
0 Comments