ADvt

धान्य चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन केली आरोपीला अटक



स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई :- ५,३०,००० रुपयाचा मुददेमाल जप्त

वणी :- सुरज चाटे

दिनांक ०४/०१/२०२3 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विभागीय कार्यालय वणी येथे हजर असतांना इसम नामे अकील शेख रा. खरबड़ा मोहल्ला रंगनाथ नगर वणी धान्य चोरी करुन ते वणी शहरात कोणाला तरी विकले आहे अशी गोपणीय बातमी प्राप्त झाली वरुन इसम नामे शेख अकील शेख रसुल वय ५० यास त्याचे राहते घरुन ताब्यात घेतले.
      त्यास धान्य चोरीबाबत विचारपुस केली असता त्याने अंदाजे ७ ते ८ महीन्यापुर्वी खडकडोह येथील अनोळखी ३ इसमांसोबत मिळुन हिवरपट्टा शेत शिवारातुन चना चोरी करुन तो मालवाहु पिकअप गाडीने वणी येथील धान्य दुकानात विकला अशी कबुली दिल्याने त्याबाबत पोस्टे मुकुटबन येथील गुन्हे अभिलेख तपासला असता दिनांक १२/०४/२०२२ रोजी हिवरपट्टा शिवारातुन ३ क्विटल चना चोरी गेल्याबाबत अप क्रमांक १४४/२०२२ कलम ४६१,३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद असल्याने यातील आरोपीस सोबत घेवुन त्याने ज्या धान्य दुकानात चोरीचा चना विकला होता त्या दुकानातुन चोरीस गेलेला ०३ क्विटल चना किंमत ३०,००० रुपये व चोरीचे धान्य नेण्याकरीता वापरलेले मालवाहू पिकअप वाहन किंमत ५,००,००० रुपये असा एकुण ५,३०,००० रुपयाचा मुददेमाल जप्त करुन आरोपीसह पुढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशन मुकुटबन यांचे ताब्यात दिला आहे.
    सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, श्री. प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि श्री. अमोल कडु, पोहवा/ उल्हास कुरकुटे, पोना/ सुधीर पांडे, महेश नाईक, सुधीर पिदुरकर, चापोहवा/ सतिश फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments