ADvt

वणी तालुक्यातील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या....



वाघदरा येथिल घटना :- प्रतीक ने टोकाची भूमिका का घेतली?...

वणी : सुरज चाटे
     वणी तालुक्यातील जुना वाघदरा येथे एका युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 24 जानेवारी 2023 ला दुपारच्या दरम्यान उघडकीस आली. 
    वणी तालुक्यातील जुना वाघदरा येथील रहिवासी असलेले किशोर पावडे यांचा मुलगा प्रतीक किशोर पावडे, वय 21 वर्ष , रा.जुना वाघदरा, दि.२४ जानेवारी 2023 ला प्रतीक याने दुपारी २ वाजता चे सुमारास प्रतीक बाहेरून घरी आला.  दरम्यान त्याच्या घरी कोणीच नसतांना स्वतःच्याच घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली, प्रतीक ने इतके मोठे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अस्पष्ट असुन. या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास वणी पोलीस करत आहे. प्रतीक च्या मागे एक भाऊ, आई वडील, व बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments