ADvt

एस टी मधील त्या दागिने चोरांच्या वणी पोलिसांनी आवळल्या मुसक्या




गर्दीचा फायदा घेत साधला होता महिला चोरांनी डाव :- ते पाचही महिला चोर वणी पोलिसांच्या जाळ्यात...

वणी :- सुरज चाटे

    दिनांक १७/१२/२०२२ रोजी फिर्यादी तापस नारायण गाईंन हे त्यांचे पत्नी व मुलासह वणी मार्गे चंद्रपुर येथे जाणे करिता बसस्थानक वणी येथे येवुन चंद्रपुर बसमध्ये चढत असतांना त्यांचे पत्नीचे पर्स मधील सोन्याचे दागीने कि.अ. ७२,५०० रू. चे अज्ञात महिलांनी चोरून नेले. अशा तक्रारी वरून पो स्टे वणी येथे अपराध क्रमांक ९४९ / २०२२ कलम ३७९ भादवि प्रमाणे नोंद असून तपासावर आहे. सदर गुन्हयाचे तपासात वरील महिला आरोपी क्रमांक १ ते ३ नामे प्रिती रोशन उफाडे वय २६ वर्ष २) सौ.प्रिती रामसिंग शेंडे वय ३० वर्ष, ३) सौ. शालु सुचीत लोडे वय ३० वर्ष तिन्ही रा. रामेश्वरी रामटेक नगर, आंबेडकर पुतळा जवळ नागपुर यानी गुन्हा केल्याचे आढळून आल्याने त्यांना गुन्हयात अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला असून गुन्हयाचा तपास सुरू आहे.
     दिनांक ०३/०१/२०२३ रोजी फिर्यादी सौ. किरण किसन पचारे रा.वणी ही तीचे पतीसह नातेवाईकांना भेटण्याकरीता वणी येथुन भद्रावती येथे जाणे करीता बसस्थानक वणी येथे येवून चंद्रपुर बसमध्ये चढत असतांना पर्समधील सोन्याची मनी, काळ्या मन्याची पोत कि. अं.२०,००० रु. व नगदी ३५०० / रूपये एकुण २३,५०० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेला. अशा तकारी वरून पो.स्टे. वणी येथे अपराध क्रमांक १०/२०2३ कलम ३७९ भादंवि प्रमाणे नोंद असुन तपासावर आहे. सदर गुन्हयाचे तपासात वरील महिला आरोपी कमांक 1 व 2 (1) सौ. लक्ष्मी रमेश हातांगडे वय ३५ वर्ष, २) सौ. नम्रता चैतराम उफाडे वय २५ वर्ष दोन्ही रा. रामेश्वरी रामटेक नगर, आंबेडकर पुतळा जवळ नागपुर यांनी गुन्हा केल्याचे आढळुन आल्याने त्यांना गुन्हयात अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला असुन गुन्हयाचा तपास सुरू आहे.
     सदरची कार्यवाही मा.डॉ. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप, अपर पोलीस अधिक यवतमाळ, मा. संजय पुजलवार उप.वि.पो.अ. वर्णी, पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात सपोनि माधव शिंदे, व पो.स्टॉफ स.फौ. / सुदर्शन वानोळे, स. फौ/ डोमाजी भादीकर, पोहता / सुहास मंदावार, पोना विठ्ठल बुवाडे पोना/ हरिद्रकुमार भारती, पोकों / पुरूषोत्तम डडमल, पोका / सागर सिडाम यांनी केली.

Post a Comment

0 Comments