ADvt

वणी गोळीबारातील हुतात्म्यांना माकप तर्फे श्रद्धांजली



वणी :  सुरज चाटे
   सन 1974 साली 2 जानेवारी ला वणी येथे महागाई चे विरोधात झालेल्या आंदोलनात पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात 7 जणांच्या बळी गेला होता. तो दिवस वणीच्या इतिहासातील अविस्मरणीय दिवस ठरला आहे, ह्या दिवसाला दरवर्षी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने त्याठिकाणी बलिदान झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते, यावर्षी सुद्धा माकपचे कॉ. शंकरराव दानव व इतर लोकांच्या वतीने वणीतील टिळक चौकात असलेल्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.

ज्याप्रमाणे आज महागाई मुळे जनता त्रस्त झाली आहे, गरिबांना ह्या महागाई मुळे आपल्या जीवनावश्यक गरज पूर्ण करणे कठीण झाले आहे, त्याच प्रकारे 1974 साली सुद्धा प्रचंड महागाई निर्माण झाली होती. जनता महागाई मुळे होरपळत होती. त्यावेळेस वणी येथे महागाई कृती समिती स्थापन करण्यात आली होती. 1974 सालाच्या नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी महागाई चे विरोधात प्रचंड मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले होते. ह्या मोर्चाचे नेतृत्वातील एक माकपचे कॉ. शंकरराव दानव हे होते. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. ह्यामुळे जनता भडकली होती. आंदोलनकर्त्यांकडून वाढता प्रचंड रोष व जोश बघून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना तितरबीतर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही परिस्थिती आटोक्यात न आल्याने शेवटी पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. ज्यामध्ये 7 जणांच्या बळी गेला. ही घटना वणीचा इतिहासातील अविस्मरणीय असून मन हेलावून सोडणारी होती. ह्या घटनेला आज 49 वर्षे झाली आहेत. ह्या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या पैकी एक कॉ. शंकरराव दानव हे आजही ह्या घटनेने हादरून जातात. 

वणीतील टिळक चौक हा गोळीबार चौक म्हणूनही परिचित आहेत. ह्याच चौकात गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलनातील हुतात्म्यांचे स्मारक बसविलेले आहे. ह्या हुतात्म्यांना आज 2 जाने. 23 ला माकपचे शंकरराव दानव, विनायक सोनूले, राध्येश्यामजी, अनिल ठाकरे, श्री पुंड बाबू, विष्णू दानव, सुनीता शिरसाट व इतर यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून व पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. पुढील वर्षी ह्या घटनेला 50 वर्षे होत असल्याने मोठा कार्यक्रम घेऊन जनतेला ह्या घटनेची माहिती देऊन महागाईचा उद्रेक कसा असतो आणि त्याचा दुष्परिणाम कसा भोगावा लागतो ह्याचे प्रबोधन करण्यात येईल असे या वेळेस कॉ. शंकरराव दानव यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments