ADvt

अवैध कोळसा वहतुकीवर वणी पोलिसांची टाच....



वणी पोलिसांची मोठी कारवाई

वाहनात 20 लक्ष अंशी हजारांचा कोळसा :- नेमका अवैद्य कोळसा कुणाचा? 

दोन कोटी एकेचाळीस लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त

वणी :- सुरज चाटे

     वणीत तालुक्यात कोळशाची मोठी बाजारपेठ असून कोळशाच्या अवैद्य वाहतुकीची गोपणीय माहिती वणी पोलिसांना प्राप्त होताच कोळशाच्या अवैद्य वहतुकीवर दिनांक 11 जानेवारी 2023 ला वाहने अडवून  कारवाई करून 8 वाहनांना  ताब्यात घेण्यात वणी पोलिसांना यश आले आहे. 
     दिनांक ११ / ११ / २०२३ रोजी पो.नि प्रदिप शिरस्कर यांना गोपनीय माहिती मिळाली की, मुकुटबन ते वणी या रोडवर काही जडवाहतुक करणारे वाहन है अवेदय कोळशाची वाहतुक करीत आहेत अशा खबरे वरून पो.नि प्रदिप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि माधव शिंदे पोस्टे वणी, सपोनि. अमोल मुडे पोह/ उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, पोना सुधिर पांडे, महेश नाईक, सुधिर पिदुरकर, बालक सतिश फुके स्थागुशा व पोस्टे वणी स्टाफ पाना हरींद्रकुमार भारती व वसिम शेख चापीना सुरेश किनाके यांनी मुकुटबन ते वणी रोडवर ग्राम पेटुर ता. वणी येथे सापळा रचुन जडवाहतुक अवैदय कोळशाची वाहतुक करणारे ०८ वाहन क्रमांक MH 40 बीजी 2658, एमएम 34 बीझेड - 2528, एमएच 31 सीक्यू. 7466, एमएच 31 सीक्यू 4752, एमएच 34 बीझेड 2529, एमएच 40 बीजी 0260, एमएच 29 बीइ 4089, एमएच 34 बीजी 2478 ताब्यात घेतले त्यांना नमुद कोळशाच्या कागदपत्राची मागणी केली असता त्यांच्याकडे कोणतेही वैदय कागदपत्रे त्यांनी सादर केले नसल्याने नमुद वाहन हे डिटेन करून पो.प्र.स. कलम ४१ (१)(ड) प्रमाणे कार्यवाही करण्यात आली नमुद वाहनामध्ये एकूण अंदाजे २०,८०,०००/ रुपायाचा कोळसा व वाहनाची अंदाजे किंमत २,२१,००,००० / असा एकुण २,४१,८०,०००/ रुपायाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, पुढिल तपास स.पो.नि माधव शिंदे पोस्टे वणी हे करीत आहेत
     सदरची कार्यवाही मा.डॉ. पवन बन्सोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुश जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ. वणी, ठाणेदार पो. नि. प्रदिप शिरस्कर, पोनि प्रदिप परदेशी स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि माधव शिंदे पोस्टे वणी, सपोनि अमोल मुडे पोह / उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, पोना सुधिर पांडे, महेश नाईक, सुधिर पिदुरकर, चालक सतिश फुके स्थागुशा व पोस्टे वणी स्वफ पाना हरींद्रकुमार भारती व वसिम शेख चापोना सुरेश किनाके यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments