वणी :- सुरज चाटे
वेकोलीच्या मुजोर भूमिकेमुळे जनसमान्य चांगलेच अडचनित आले असून अनेक समस्यांच्या पाढा घेऊन मनसे राज्य उपाध्यक्ष थेट वेकोली क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालय भालर येथे दाखल होत विविध समस्यांवर आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह दिनांक 06 डिसेंबर 2022 ला निवेदन दाखल केले तसेच मागण्यांची पूर्तता न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा अल्टीमेट दिला असून आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बादीत झाल्यास वेकोली स्वतः जबाबदार राहील याची दक्षता घ्यावी असे निवेदनातून स्पष्ट केले आहे.
गेल्या अनेक वर्षेपासुन वे. को.ली ने मनमानी कारभार चालविला आहे. त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता तर त्यामध्ये भर पडुन नागरीकांना स्वतः चा जिव गमवावा लागत आहे. हयाचे प्रमुख कारण वे को.ली ने नियम बाह्य काम करण्याची पध्दत कारणीभुत ठरत आहे व या सर्व बाबीस वेकोली स्वतः जवाबदार आहेत. तरी आपणास शेवटची विनंती करतो की, आपण केलेल्या (ऑस्ट्रेलियन बाबुळ) ची झुडपे त्वरीत नष्ट करण्यात यावी. जेणेकरून जनतेचा आरोग्यास विपरीत परिणाम होणार नाही. सोबतच नरभक्षक वाघासोबत इतरही प्राणी मानव जिवित्याला धोका निर्माण करणार नाही, पुनर्वसनाचा विषय त्वरीत मार्गी लावुन जनतेस न्याय दयावा. वे.को. ली च्या प्रदुषणामुळे शेतीचे पिकाचे नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यास त्वरीत मोबदला देण्यात यावा. सोबतच वे. को.ली विभागात असणाऱ्या स्थानिकांना सर्व प्रथम रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. वाघाचे वास्तव्य असणाऱ्या गावांना वनविभागाला सोबत घेऊन गावा गावामध्ये रक्षक देण्यात यावे. गावातील महिलांनकरिता रोजगारच्या सुविधा पुरविण्यात याव्या. गावात व गावालगत पथदिव्याची व्यवस्था त्वरीत करण्यात यावी. त्याचप्रमाणे रस्त्याची दुरावस्था याकडे लक्ष केंद्रीत करून रस्त्याची कामे त्वरीत हाती घेण्यात यावी. प्रदुषण विभागाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे. वेकोली अंतर्गत शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना त्वरीत बस सुविधा पुरविण्यात यावी. वे.को.ली अंतर्गत दत्तक असणाऱ्या गावांना संपुर्ण सुविधा देऊन विकास कामे करण्यात यावी.
वणी लगत असणाऱ्या रेल्वे साईडिंग मुळे होणारे प्रदुषण थांबवावे अथवा रेल्वे साईडिंग वणी पासुन दुर करण्यात यावी. सदर बाबीची पुर्तता त्वरीत करण्यात यावी असे न झाल्यास वे.को. ली विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्था बादीत झाल्यास आपण स्वतः जबाबदार राहाल याची दक्षता घ्यावी अशा मागण्यांचे निवेदन मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी दिनांक 06 डिसेंबर 2022 रोजी वेकोली क्षेत्रीय महाप्रबंधक यांना दिले आहे.
0 Comments