चंद्रपूर :- सुरज चाटे
चंद्रपूर जिल्ह्यातील वेंडली हे गांव अगदी चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर असून गेल्या अनेक दिवसांपासून येथील विकास खुंटला होता, त्यातच विकास कामे देखील पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नव्हते तसेच मात्र मागील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांना धोबी पछाड देत वेंडली- महकुरला येथील मिनी मंत्रालय आपल्या ताब्यात घेत नुसती सत्ताच काबीज न करता येथील विकास कमाना देखील गती देत शासन स्तराहुन निधी खेचून आणून विकासात्मक दृष्टिकोन ठेवीत सरपंच सौ प्रतिमा प्रकाश अलवलवार यांनी विकास कामांचा झंझावात सुरू केला आहे.
मा. आ, किशोर भाऊ जोरगेवार यांच्या हस्ते चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील वेंडली येथील समाज भवनाचे भूमिपूजन दिनांक 19 ला मोठ्या थाटात पार पडले. यावेळी सरपंच सौ प्रतिमा प्रकाश अलवलवार , पोलीस पाटिल, गुरुदेव सेवा मंडळ वेंडली, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य गण, जिल्हा परिषद चे मुख्याध्यापक, वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज शाळेतील मुख्याध्यापक व वेंडली गावातील समस्त नागरिक उपस्थित होते. यावेळी आ किशोर भाऊ जोरगेवार यांनी आपले मनोगत व्यक्त करीत जनता जनार्धनाच्या विकासातच माझे सामर्थ्य असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच आमदार निधीतून 20 लक्ष रुपयांचे समाज भवन मंजूर केल्याबद्द्ल सरपंच सौ प्रतिमा प्रकाश अलवलवार यांनी आ किशोर भाऊ जोरगेवार यांचे आभार मानले तसेच त्यांना गावाला मुख्य प्रवेश द्वार देण्याची सुद्धा यावेळी मागणी केली त्या मागणीला दुजोरा देत आ किशोर भाऊ जोरगेवार यांनी सुद्धा गावाला प्रवेश द्वार मंजूर करून देण्याचा शब्द दिला आहे.
विकासकामांचा सपाट पाहता व जनता जनार्धनाचा आशीर्वाद यामुळेच मी वेंडली-मायकुर्ला गटग्राम पंचायतीचा अविकसित असलेला विकास अविरत करीत राहील तसेच जनतेला उपयुक्त अशा विविध योजना राबवून सर्व सोयी सुविधेने सुसज्ज अशी ग्राम पंचायत बनविन्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार असल्याचे सरपंच सौ प्रतिमा अलवलवार यांनी यावेळी बोलुन दाखविले.
0 Comments