ADvt

नवकार नगरीत वाघाचा तांडव?....





वाघाने केले रोह्याला जखमी? :- तो वाघच....नागरिक, डरकाळ्या ने नागरिक भयभीत....
वणी :- सुरज चाटे
वाघ आला रे आला? :-  तातडीने उपाय करण्याची गरज
     गेल्या काही दिवसात रांगणा भुरकी सह वणी तालुका परिसरात वाघाची दहशत सुरू असताना आता वणी-नांदेपेरा बायपास रोड लगत असलेल्या नवकार नगरी (जुनी न्यु व्हिजन कॉन्व्हेंट) जवळ दिनांक 19 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 4 वाजताच्या दरम्यान रोह्या च्या कळपावर हल्ला झाला असुन त्यातील एक रोही जखमी सुदधा झाला आहे, तसेच नवकार नगरीतील एका घर समोरील तारेचे कुंपण तोडून जणू वाघ व रोहीची घोरी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अंधारा काळोख असल्याने तसेच वाघाची दहशत लक्षात घेता मोठमोठ्या डरकाळ्या मुळे कोणीही बाहेर निघून प्रत्यक्षात वाघाला किंवा नेमका प्रकार काय झाला हे पाहले नसले तरी, परिसरातील नागरिकांकडून वाघाणेच हल्ला केला असल्याचा? कयास लावण्यात येत आहे. सध्या तरी या परिसरात वाघ असल्याचे निष्पन्न झाल्यास त्या वाघाने कोणताही जीवित हानी, किंवा अनुचित प्रकार केला नसून तो वाघ नरभक्षी होण्या आधी संबंधित विभागाने यावर तातडीने उपाय योजना करून वाघाला जेरबंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
     वाघ दिसल्याच्या मोठ्या घटना शिरपूर, निलजई, सुंदरनगर, तरोडा, लाठी बेसा, बेलोरा, उकणी, निवली, रांगणा भुरकी आदी कोळसा खान परिसरात घडत असून अजून पर्यंत या वाघांना पकडण्यात वन विभागाला यश आले नसून हा वाघ अजूनही आपला मुक्त संचार करीत असल्याचे दिसून येत आहे.  शनिवार दिनांक 19 ला पहाटे 4 वाजताच्या सुमारास नवकार नगर नांदेपेरा रोड लगत रोह्या च्या कळपावर हल्ला झाला असुन त्यातील एक रोही जखमी सुदधा झाला आहे, तसेच नवकार नगरीतील एका घर समोरील तारेचे कंपाऊन वाल तोडून जणू वाघ व रोहीची घोरी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र अंधारा काळोख असल्याने तसेच वाघाची दहशत लक्षात घेता मोठमोठ्या डरकाळ्या मुळे कोणीही बाहेर निघून प्रत्यक्षात वाघाला किंवा नेमका प्रकार काय झाला हे पाहले नसले तरी, नवकार नगर, रहिवासी येथील जितेंद्र पुनवटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला करणारा वाघच असुन वाघाणेच रोह्यावर हल्ला करून त्याला जखमी केले असल्याची महिती त्यांनी दिली आहे, तसेच सदर ठिकाणी पथदिवे नसून संपूर्ण अंधार आहे, दरम्यान या मार्गावर संबंधित विभागाकडून पथदिव्याची मागणी होत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी तातडीने वणी पोलीस विभाग व वन विभागाला संपर्क साधला त्यात दोन्ही विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले मात्र वाघाने आपला मोर्चा दुसऱ्या दिशेने वळविला असुन या वाघावर उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

Post a Comment

0 Comments