ADvt

श्री रंगनाथ स्वामी देवस्थान च्या वतीने वैकुंठ महोत्सवाचे आयोजन


वणी :- विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन 

वणी :- राजु गव्हाणे

     शहरातील प्राचीन वारसा लाभलेले श्री रंगनाथ स्वामी देवस्थान परिसरात प्रसिद्ध आहे, संपूर्ण भारतातील शेषनागावर निद्रास्थ भगवान विष्णू ची काळ्या पाषाणातील मूर्ती शहराचे  वैभव आहे दरवर्षी प्रमाणे या वर्षांला कार्तिक शुद्ध चतुर्दशी दिनांक 6 नोव्हेंबर २०22 रोज रविवार ला देवस्थान चे अध्यक्ष ह.भ.प. मनुमहाराज तुगनायक यांच्या मार्गदर्शनात विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन वैकुंठ महोत्सव साजरा होणार आहे.
     यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यातश्री वैकुण्ठ महोत्सव - २०२२, कार्तिक शुद्ध चतुर्दशी (वैकुण्ठ चतुर्दशी) रविवार दि. ६ नोव्हेंबर २०२२ सकाळी १० ते १ श्री रंगनाथ स्वामींच्या मूर्तीचा महाअभिषेक (अनेक दाम्पत्यांद्वारा)पूजा व अर्चना, दुपारी १ ते २ ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज उपासना मंडळ, वणी द्वारा, सामुहिक उपासना, दुपारी २ ते, महाप्रसाद, सौजन्य : श्री विजयबाबु पारसमलजी चोरडीया, दुपारी ४ ते ७ विष्णुसहस्त्रनामावली पठन व भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रस्तुतकर्ता : ह. भ. प. मनुमहाराज तुगनायत आणि संच, सायं. ७ ते ८, सामुहिक श्रीसुक्त हवन,सौजन्य : श्री यज्ञ सेवा समिती, वणी, रात्री ८ ते ९ रात्री ९ ते १२, धार्मिक देखावा (झाँकी), दीपोत्सव, हरिहर मिलन, ब्रम्होत्सव, छप्पन भोग व महाआरती, पौरोहित्य : पं. श्री. गोविंद महाराज रुपनारायणजी जोशी हिंगणघाट व वाद्यवृंदासह दक्षिण भारतातील वेदशास्त्र संपन्न पंडीत, तरी आपण सहकुटूंब सहपरिवार ईष्टमित्रासह या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावे व आपल्या जीवनांत पुण्यार्जन करावे आवाहन देवस्थानाकडून करण्यात आली आहे. 
     

Post a Comment

0 Comments