वणी :
राजूर येथे रेल्वे व वेकोलीचा माध्यमातून राजूरवासीयांच्या मूलभूत हक्कावर होत असलेल्या गळचेपी मुळे राजूर बचाव संघर्ष समितीचे वतीने बेमुदत आमरण उपोषणाला वणी येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून उपोषणाला चार महिलानी सुरुवात केली आहे.
ह्या उपोषणाला पहिल्याच दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. शंकरराव दानव व अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषदेचे कॉ. गीत घोष यांनी भेट देऊन राजूर वासीयांच्या हक्काच्या लढाईला समर्थन केले आहे, तसेच क्रांती युवा संघटनेने देखिल पाठिंबा दर्शविला आहे, तसेच संघर्षात सोबत असल्याचे यावेळी बोलून दाखविले, यावेळी क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेश भाऊ खुराणा, ऍड सुरज महारतळे, राजु गव्हाणे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजूर येथे आलेल्या वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांच्या कोळसा सायडिंग व वेकोलीचे होत असलेले खाजगीकरण ह्यामुळे येथील राहिवासीयांना त्यांची राहत असलेली घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे येथील कोळसा सायडिंग रहिवासी क्षेत्रालगत असल्याने गावात प्रचंड प्रदूषण निर्माण होऊन गावात वेगवेगळ्या आजारांचे प्रादुर्भाव होत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे येथे सुरू असलेल्या रेल्वे कोळसा सायडिंग व कोल डेपो ला स्थानिक स्वराज्य संस्थेची व प्रदूषण नियंत्रण बोर्डाची परवानगी नसल्याने त्या अनधिकृत आहेत. या संदर्भात गेल्या 10 महिन्यापासून सातत्याने संघर्ष सुरू आहे. जिल्हाधिकारी यांनी अवैध सायडिंग हटविण्यासंदर्भात आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी मात्र गेल्या 1 महिन्यापासून झाली नाही. त्यामुळे शेवटी राजूर बचाव संघर्ष समिती चे वतीने दि. 17 ऑक्टो 22, सोमवार पासून बेमुदत आमरण उपोषण वणी उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे.
ह्या आमरण उपोषणाला सौ. दिशाताई अमृत फुलझेले, सौ. नाजूकाताई प्रशांत बहादे, सौ. वीणाताई अमर तितरे व सौ. शालूताई संजय पंधरे ह्या बसल्या आहेत. ह्या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी सरपंच सौ. विद्याताई पेरकावार, संघदीप भगत, अशोक वानखेडे, मो. असलम, डेव्हिड पेरकावार, कुमार मोहरमपुरी, ऍड. अरविंद सिडाम, प्रवीण खानझोडे, जयंत कोयरे, सावन पाटील, अमृत फुलझेले, नंदकिशोर लोहकरे, साजिद खान, नितीन मिलमिले, प्रदीप बांधुरकर अमर तितरे, अभिषेक अंडेल, सनी राजनालवार, अजित यादव, अनवर खान, अकरम वारसी व अन्य मेहनत घेत आहेत.
0 Comments