ADvt

*शेतकऱ्यांना देण्यात येणारे गव्हाचे नियतन पूर्ववत उपलब्ध करून द्या* .



वणी :- सुरज चाटे
    मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर ही संघटना मागील 17 वर्ष महाराष्ट्रातील वंचित समूहाच्या मूलभूत हक्कांसाठी सातत्याने कार्यरत आहे. या संघटनेतर्फे मा.उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या गव्हाचे नियमन पुर्ववत करून उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली .
       महाराष्ट्रात अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या 14 जिल्ह्यातील साधारण 10 लाख शेतकरी(केशरी) कार्डधारक यांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते. भारतीय अन्न महामंडळाच्या 31/05/22 च्या पत्राने या योजनेतील गहू बंद करण्यात येणार असल्याचे दिसून येते. तसेच दि.19/05/2022 च्या पत्राने केवळ तांदुळाचे नियतन उचल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु प्रत्यक्ष गव्हाचे वाटप पूर्णपणे बंद करून काही ठिकाणी केवळ माणसी एक किलो तांदूळ दिला जातो. या 14 जिल्ह्यातील शेतकरी निसर्गाच्या वक्र दृष्टीने सतत हवालदिल,अडचणीत असल्याने यांना सदरची सवलत देण्यात आलेली आहे.या सर्व पात्र लाभार्थींना सवलतीच्या दरातील अन्न धान्याची नितांत गरज असल्याने एमपीजे नेमदत करण्याची मागणी केली आहे .
     माननिय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी या प्रकरणात लक्ष देऊन 14 जिल्ह्यातील एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना मिळणारे गव्हाचे नियतन पूर्ववत सुरू करावे.व कमी करण्यात किंवा कमी वाटप करण्यात येत असलेल्या तांदळाबाबत चौकशी करून तातडीने कार्यवाही कराव, शेतकरी हितार्थ या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन शेतकरी कुटुंबाना दिलासा देऊन सहकार्य करण्याची विनंती निवेदनाव्दारे करण्यात आली .        
     यावेळी शहराध्यक्ष डॉ. सैय्यद अतीक , उपाध्यक्ष राजु देवराव गव्हाने व जमीर हमिद शेख, कोषाध्यक्ष जावेद हुसेन हैदरी , शफाअत सय्यद, जफर खान, गणेश आवारी, दिपक मोरे, समीन  इद्रिस शेख , शेख अकरम हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments