ADvt

सारख्या पावसाने घराची भिंत कोसळली.... #Wall #Wani

 


15 Jul, 2022

ImageImage

वणी :- सुरज चाटे

पावसाचा कहर सर्वत्र असून दिनांक 14 च्या पहाटे सुमारे 3 वाजता दरम्यान झालेल्या पावसात जयवंत ओचावार यांच्या घराची वरच्या मजल्यावरील भिंत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली, त्यातच रात्रीचा वेळ असल्याने व रस्त्यावर कोणी नसल्याने कोणतीही हानी झाली नाही.

रविवार पासून परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असुन आजपर्यंत पावसाचा चांगलाच तांडव सुरु आहे. परिसरातील नाले दुथडीभरुन वाहत आहे. त्यातच अनेकांचे घराचे छत उडाले असून भिंती सुद्धा कोसळल्या आहे, अशीच एक घटना गाडगे बाबा चौकपरिसरातील रहिवासी जयवंत ओचावार यांच्यावर घडली असुन मध्यरात्री त्यांच्या घराची भिंत अचानक कोसळली असून सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र त्यांचे मोठे नुकसान झाले आहे, घटनेची माहिती तलाठी उराळे यांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.


Image


वाचकांना सूचना :- सत्यभाषा या न्युज पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक / संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो यवतमाळ जिल्हा न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.

Post a Comment

0 Comments