सारख्या पावसाने जनजीवन विस्कळीत ..
14 Jul, 2022
वणी :- सुरज चाटे
वणी शहराची जीवनदायिनी असलेली निर्गुडा नदी दुथडी भरुन वाहत आहे. वणी शहर व गणेशपुर गावाला जोडणाऱ्या निर्गुडा नदीच्या पुलावरुन पाणी ओसांडून वाहत असल्याने वाहतूक खोळंबली आहे.तालुक्यात तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असुन शहरातील काही भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे.
रविवार पासून परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असुन आजपर्यंत पावसाचा चांगलाच तांडव सुरु आहे. परिसरातील नाले दुथडीभरुन वाहत आहे. नांदेपेरा मार्गावरील गुंजे चा नाला दुथडीभरुन वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परिसरात स॔ंततधार असलेल्या पावसाने तालुक्यातील काही गावापासून संपर्क तुटला आहे. तसेच जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, काही ठिकाणावरील पुल वाहुन गेल्याच्या घटना समारे आल्या असून, शहरालगत असलेल्या निर्गुडा नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने गणेशपूर पुलावरून पाणी तुडुंब वाहत असुन शासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
0 Comments