पुरामुळे भुरकी गावाला पाण्याचा वेढा....
18 Jul, 2022
वणी :- सुरज चाटे
वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे भुरकी गावाला पाण्याचा पूर्ण वेढा पडला व पुढील काही तासात रांगणा या गावाचा संपर्क तुटण्याची भीती गावकऱ्यांत असून गावकरी भयभीत झाले आहे.
शेलू, भुरकी, शिवणी, धोबे या गावांत पुराचे पाणी घुसून गावात भीती सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने गांभीर्य समजून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. याकडे तातडीने अति महत्व देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी गावकऱ्याकडून होत आहे.
0 Comments