सततच्या पावसाने “ओला दुष्काळ " त्वरित जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्या.....
18 Jul, 2022
वणी :- सुरज चाटे
सततच्या पावसाने शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे, त्यांना दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर ओढवत असुन त्यामुळे त्यांना शासन दरबारातून मदतीची तीव्र आवश्यकता असुन बळीराजा हवालदिल झाला असल्याने अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईची पाहणी करून अहवाल सादर करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी क्रांती युवा संघटनेने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिनांक 18 जुलै 2022 ला दिलेल्या निवेदानातून केली आहे.
सततच्या पावसामुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीने ग्रस्त शेतकऱ्याना प्रशासनाने नुकसानीचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवून परिसरातील शेतकऱ्याना तत्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा. आधीच खरिप हंगामामध्ये पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. काही शेतकऱ्याना तर पदरमोड करून दुबार पेरणी करावी लागली. मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पिके चागल्या स्थितीत होती. परंतु गेल्या सात दिवसापासून संततधारा पाऊस पडल्यामुळे पिके पिवळी होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
शेतकर्यांनी खरीपात प्रामुख्याने घेतलेली सोयाबीन, कपासी व तूर पिवळी पडून सडू लागल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. तरी आपणास विनंती आहे कि, त्वरित सरकारने “ ओला दुष्काळ "जाहीर करण्यात यावा तसेच आर्थिक नुकसान भरपाई देऊन शेतकर्यांना न्याय द्यावा अशा मागणी चे निवेदन क्रांती युवा संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. यावेळी क्रांती युवा संघटनेचे संस्थापक राकेशभाऊ खुराणा, जिल्हाध्यक्ष अविनाश भुजबळराव, वणी विधानसभा अध्यक्ष सुरज महारतळे, राजू गव्हाणे, ॲड. शुभम महारतळे , अभिजीत पथाडे, उमेश असुटकर, आकाश महाडुळे, रोहन काळे, दिनेश मांडवकर,अमोल मोहुर्ले, सुरज चाटे, सतीश गेडाम, प्रमोद लोणारे, सुधीर खंडाळकर, महादेव दोडके, मनोज अत्राम, दीपक मोरे, नागो आतमगल, विकेश पानघाटे आदी उपस्थित होते
0 Comments