08 Jul, 2022
वणी :- राजु गव्हाणे
सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बनच्या वतीने दिनांक 1 जुलै आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील मानवी जीवनातील जगण्याची दिशा देणारा माणसातील देवमाणूस म्हणजेच डॉक्टर अशा कर्तृत्वान डॉक्टरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील,अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर यांच्या नियोजनाखाली कार्यक्षेत्रातील पाचही राज्यात डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
त्याच अनुषंगाने वणी शाखेच्या वतीने सुद्धा वणी येथे हा कार्यक्रम घेण्यात आला वणीतील गन्मान्य प्रसिद्ध डॉक्टर्स त्यांच्या निवासस्थानी व कर्तव्यस्थानी जाऊन कर्तृत्ववान डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला यावेळी डॉ गणेश निमजे सर, डॉ सुनीलकुमार जुमनाके सर, डॉ राजेंद्र धांडे सर, डॉ सतीश चहारे सर, डॉ गजानन पावडे सर, डॉ बबन ढेंगळे सर, डॉ राहुल खाडे सर, डॉ युधिष्ठीर सवाई सर, डॉ जानराव ढोकने सर, यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वणी शाखेतील शाखा व्यवस्थापक विजय मोडक, सहायक शाखा व्यवस्थापक सुनील चिंचोळकर, कनिष्ठ अधिकारी सौ प्रांजली ठाकरे, सुरज चाटे, तुषार ठाकरे, मंगेश करंडे, सब स्टाफ आतिष बुरेवार, जयवंत ओचावार तथा समस्त दैनिक, आवर्त ठेव अभिकर्ता उपस्थित होते.
0 Comments