अरे बापरे....एकाच शेतकऱ्याच्या अख्या 60 एकर शेतीत पुराचे थैमान....
23 Jul, 2022
वणी :- सुरज चाटे, स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट
गेल्या दोन दिवसा अगोदर जिकडे तिकडे पावसाचे मोठे थैमान पहावयास मिळाले असून सततच्या पावसाने आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर येत होत्या, कुठे भिंत, कुठे घर कोसळले तर कुठे पूलावर पाणी आदी समस्यांना सामोरे जात जनतेने यांवर आपले नियंत्रण ठेवत आता आलेला पुर ओसरला असून मात्र आता जे नुकसान पाहता अंगावर शहारे येण्याजोगे दृश्य असून डोळ्याने ते न बघावे अशी स्थिती निर्माण झाली असून त्यात मोठी नुकसान झाल्याचे दिसत असुन वर्धा नदीला आलेल्या, पाटाळा येथील नदीच्या पुरात चिखलगाव येथील शेतकरी रामचंद्र मुकींदा कालेकर यांचे तब्बल 60 एकर शेती पुराच्या पाण्यात बुडाली असल्याने तीन दिवस हा पूर कमी झालाच नसल्याने मोठी भयावह स्थिती निर्माण होत, गोठ्यात बांधून असलेले 17 जनावरांचा काही जागीच तर काही जनावर वाहून गेले, काहींना जलसमाधी मिळाली, असून कोंबडे, बकरे, मरण पावले, त्यात दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर व बंडा त्यात असलेले समान यांना मोठी हानी झाली असून 15 ते 20 लाखाच्या वर नुकसान झाल्याने शेतकरी मोठा हवालदिल झाला असून त्याला शासन मदतीची तातडीने गरज आहे.
पुराचे थैमान अनेक भागात बसले असून काही गावांचा संपर्क तुटला असून काही भाग जलमय झाल्याचे दिसून आले तर काही ठिकाणी पुलावरून पाणी असल्याने वाहतूक खोळंबली होती. पुराचा मोठा फटका वणी तालुक्याला चांगलाच बसला असून त्यात शेत, घर, जमिनी, नाले, नद्या ओव्हरफलो दिसल्या तर यात पाटाळा येथील नदीच्या पुरात लगतच असलेल्या रामचंद्र मुकिंदा कालेकर, रा चिखलगाव येथील शेतकऱ्यावर ओढवलेले संकट पाहता अंगावर शहारे सोडणारे असून त्यात अख्या 60 एकर शेतीला पुराचा फटका बसला आहे. 60 एकर शेतीत पाणी जाऊन, शेतीला जणू नदी पात्राचे स्वरूप आले होते, गोठ्यात बांधून असलेले 17 बैल, कोंबडे, बकरे, अक्षरशः काही वाहून गेले असून, काही पाण्यातच मार्ग न मिळाल्याने जागीच मृत्युमुखी पडल्या, शेतात 35 ते 40 बॅग सोयाबीन पेरणी होऊन होते मात्र काळाच्या घालाने संपूर्ण उध्वस्त केले.
त्यातच शेतात असलेल्या बंड्यात 3 पोते तांदूळ, 5 पोते गहू, चणादाळ 15 कुळ, तुरीची दाळ 2 पोते, मुंग दाळ 5 कुळ, साखर गोनी 1 पोते ऐन उद्या हे सगळं घरीच न्यायचे आणि विकण्यास घेऊन जायचे असे असताना पुराच्या पाण्याने सर्व उध्वस्त केले. तर बकऱ्या, कोंबळे, फवारणी पंप, बंड्यातील 2 रूम मध्ये असलेले कुटार, ट्रॅक्टर तसेच चारचाकी वाहन असा एकूण 15 ते 20 लाखाचे एकूण नुकसान झाले असून एकाच शेतकऱ्याचे एवढे मोठे नुकसान झाले असून त्याच्या परिवारावर मोठी दयनीय अवस्था झाली असल्याने नेमके जगावे की मारावे? असाच प्रश्न पडला असून त्यांना शासन दरबारातून तातडीने मदतीची आवश्यकता असून संबंधित अधिकाऱ्याने तातडीने पंचनामे करून पुढील कारवाई करून मदत जाहीर करावी व एवढ्या मोठ्या नुकसानाची भरपाईची मागणी शेतकरी रामचंद्र कालेकर करीत आहे. संपूर्ण परिस्थितीत नांदेपेरा येथील सरपंच विलास चिकटे व त्यांचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून उभे होते व त्यांनी शेतकऱ्याला धीर देत सहकार्य केले.
पुराचे रुद्र रूप पुलाच्या रस्त्यावरून......
सलग तीन दिवस राहलेला पूर 20 ला ओसरला मात्र आलेल्या पुरामुळे परिसरात किती मोठा फटका बसला असावा याचा अंदाज पुलाच्या रस्त्याला पाहूनच लक्षात येत असून रस्ता संपूर्ण उध्वस्त झाला आहे, मग परिसरातील जनतेची, जनावरांची, शेतीची काय व्यथा झाली असावी? अजूनही जड वाहनांना जाण्या येण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
नांदेपेरा येथील सरपंच चिकटे ठरले जनावरांसाठी देवदूत.....
पुराचे पाणी वेळोवेळी चढतच असल्याने त्यातून सावरण्यासाठी कालेकर कुटुंबांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले. मात्र नांदेपेरा येथील सरपंच विलास चिकटे व संपूर्ण त्यांचे सहकारी गुरांना वाचविण्यासाठी आपले स्वतःचे प्राण धोक्यात घालून त्याने 4 जनावर वाचवली असून जनावरांकरिता अशोक देवदूतच ठरला आहे.
0 Comments